मुंबई – अभिनेत्री रिंकू राजगुरू हे नाव समोर आलं की आठवतो नागराज मंजुळे यांचा सैराट चित्रपट आणि समोर येतो त्यातील आर्चीचा चेहरा. सैराटनांतर रिंकूने अनेक चित्रपट केले परंतु आजही तिला अनेकजण ‘आर्ची’ याच नावाने ओळखतात. रिंकू आपल्या सोशल मिडीयावर चांगलीच ऍक्टिव्ह असते.
नुकतेच रिंकूने आपल्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रिंकू ट्रॅडिशनल मराठमोळ्या लूकमध्ये दिसली आहे. दिवाळीचा मुहूर्त साधत जणू रिंकूने आपल्या चाहत्यांसाठी हे फोटो शेअर केले आहेत.
In a world full of trends, I want to remain a classic या कॅप्शन खाली रिंकूने आपले फोटो पोस्ट केले आहेत. लाल रंगाची साडी आणि तिला सोनेरी रंगाची किनार त्यासोबतच साधी हेअर स्टाईल कानातील झुमके आणि चेहऱ्यावरील स्माईल असा रिंकूचा लूक चाहत्यांना प्रचंड आवडताना दिसत आहे.
रिंकूने मराठीसह हिंदी आणि इतर भाषांमध्ये देखील चित्रपट केले आहेत. प्रत्येक चित्रपटात काहीतरी वेगळं घेऊन येणाऱ्या रिंकूच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता आता प्रेक्षकांना आहे. रिंकूच्या या फोटोंवर चाहत्यांनी हार्ट इमोजी पोस्ट करत तिचे भरभरून कौतुक केले आहे.