पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) -पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेल्या प्रकल्पाची कामे का पूर्ण होत नाहीत. ती वेळत पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरव राव यांनी टेक महिंद्रा आणि एल ऍण्ड टी कंपन्यांच्या प्रतिनिधींना आज बैठकीत दिल्या.
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची 20 वी बैठक विभागीय आयुक्त सौरव राव यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 26) ऑटो क्लस्टर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात आज पार पडली.
यावेळी महापालकिा आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधकिारी शेखर सिंह, नामनिर्देशक संचालक (जीओआय) ममता बत्रा, स्वतंत्र संचालक यशवंत भावे, प्रदीपकुमार भार्गव, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (ऑनलाईन), सहमुख्य कार्यकारी अधकिारी किरणराज यादव, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधकिारी सुनिल भोसले, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, महाव्यवस्थापक अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, सहा.मुख्य कार्यकारी अधकिारी लक्ष्मीकांत कोल्हे यांच्यासह अधकिारी तसेच सल्लागार प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीमध्ये विविध विषयांवर संचालक मंडळाने चर्चा केली. तसेच, स्मार्ट सिटी प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिका-यांनी निश्चित केलेल्या कालमर्यादेबाबत संचालक मंडळाने समाधान व्यक्त केले. तसेच, मे. टेक महिंद्रा आणि मे. एल ऍण्ड टी कंपनीच्या प्रतिनिधींसोबत प्रत्यक्ष चर्चा करून प्रकल्प अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या. सन 2021-22 या आर्थिक वर्षाचा ताळेबंद मंजूर करून वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्याबाबत शिफारस करण्यात आली. कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा 30 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रकल्प सल्लागारांनी स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचे भौतिक व आर्थिक प्रगतीबाबत सादरीकरण केले. त्यावर संचालक मंडळाद्वारे चर्चा होऊन पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात आले. कंपनी सेक्रेटरी चित्रा पवार यांनी उपस्थितांचे स्वागत करून
आभार मानले.