मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या तब्बल सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
याशिवाय राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अहमदनगर आणि सोलापूर, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विजयकुमार गावित यांच्याकडे नंदुरबार, गिरीश महाजन यांच्याकडे धुळे,लातूर, नांदेड, गुलाबराव पाटील यांच्याकडे बुलढाणा, दादा भुसे यांच्याकडे नाशिक, संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
याशिवाय सुरेश खाडे यांच्याकडे सांगली, संदिपान भुमरे यांच्याकडे औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरी आणि रायगड, तानाजी सावंत यांच्याकडे परभणी आणि उस्मानाबाद (धाराशिव) तर रवींद्र चव्हाण यांच्याकडे पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली गेली आहे.
अब्दुल सत्तार- हिंगोली, दीपक केसरकर -मुंबई शहर, कोल्हापूर, अतुल सावे – जालना, बीड, शंभूराज देसाई – सातारा, ठाणे आणि मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगराचे पालकमंत्री असणार आहेत.