मुंबई – सपना चौधरी आपल्या डान्ससाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. मूळची हरियाणाची असूनही सपनाचे चाहते देशासह विदेशात देखील आहेत. सपनाचे ठुमके पाहण्यासाठी लाखो लोक तुफान गर्दी करतात. ज्यांना कार्यक्रमासाठी हजेरी लावता येत नाही ते इंटरनेटवर कार्यक्रमाला हजेरी लावतात. म्हणुणच सपनाचे अनेक डान्स व्हिडीओज व्हायरल होत असतात.
असाच सपनाच्या एका लेटेस्ट गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागे सपनाचा कडक डान्स आहे असं तुम्हाला वाटेल परंतु तस नाही या व्हडिओचे कमालीचे शब्द यामुळे हा गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लाहोर मै चर्च अफगाण मै परचे… दाऊद की चोरी से असे बोल असणारे गाणे सध्या तुफान व्हायरल होतंय. या गाण्याच्या ठेक्यावर सपना पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये डान्स करताना दिसत आहे.
सपना चौधरी एका शोसाठी लाखो रुपये घेते तर व्हिडीओ अल्बमसाठी सपनाची फीज त्याहूनही अधिक असते. भारतासह सपना विदेशातही शोज करते. इंटरनेटवर तिचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होताना दिसतात.