पुणे, दि. 10 -“आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत “हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करण्यासाठी रेल्वेच्या पुणे लोको शेडच्या वतीने वरिष्ठ मंडल यांत्रिक देवेंद्रकुमार त्रिपाठी यांच्या नेतुत्वाखाली रॅली काढण्यात आली.
यामध्ये 500 हून अधिक रेल्वे कर्मचारी सहभागी झाले होते. या रॅलीला डीजल लोको शेड येथून सुरुवात झाली. नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे, राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान राखणे आणि घरावर तिंरगा लावण्यासाठी प्रेरित करण्यासाठी रॅली काढण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
“आरटीओ’तर्फे बाईक रॅली
आजादी का अमृत महोत्सवांतर्गत “आरटीओ’कडून उद्या (दि. 11) बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, यात “आरटीओ’चे 50 हून अधिक कर्मचारी आणि महिला अधिकारी भाग घेणार आहेत. ही रॅली “आरटीओ’तून निघणार आहे.