मुंबई – बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाला आता कायदेशीर लढाईला सामोरे जावे लागणार आहे. चित्रपटाचा अभिनेता अक्षय कुमारवर गुन्हा दाखल झाल्याची बातमी समोर येत आहे.
View this post on Instagram
भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी या चित्रपटावर नुकसान भरपाईची मागणी करत गुन्हा दाखल करणार आहेत. चित्रपटात ‘राम सेतू’चा मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. स्वःताहा सुब्रमण्यम स्वामी यांनीच खटला भरल्याची माहिती दिली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबतची संपूर्ण माहिती ट्विटद्वारे दिली आहे.
View this post on Instagram
चित्रपटात राम सेतूचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. तथ्यांशी छेडछाड केल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपल्या ट्विटमध्ये सुब्रमण्यम स्वामींनी लिहिले,’मी अभिनेता अक्षय कुमार आणि कर्मा मीडिया यांच्यावर त्यांच्या चित्रपटातील राम सेतू प्रकरणाच्या चुकीच्या चित्रणामुळे झालेल्या नुकसानीसाठी दावा दाखल करत आहे.’
एप्रिल महिन्यात राम सेतू चित्रपटाचे पोस्टर व्हायरल झाले होते. अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. पोस्टरमध्ये अक्षय कुमारसोबत जॅकलिन आणि सत्यदेव दिसत आहेत. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये हे तिन्ही कलाकार एका ऐतिहासिक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हे तिघे एका गुहेच्या आत दिसतात, ज्याच्या भिंतीवर एक विचित्र खूण आहे.
View this post on Instagram
अक्षय कुमार हा चित्रपट 2022 च्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित केली आहे. मात्र रिलीजपूर्वीच हा चित्रपट वादात सापडला आहे. अक्षय कुमारचा आगामी ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.