मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले. त्यासोबतच राज ठाकरेंनी शिवसेना सोडतानाच्या अनेक गोष्टींचा खुलासा देखील यावेळी केला. मात्र आता मनसेच्या एका नेत्याने बाळासाहेब आणि राज ठाकरेंचा फोटो ट्विट करत सूचक इशारा दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत काही आमदारांसह वेगळा गट करून भाजपच्या पाठींब्यावर राज्यात सरकार स्थापन केले. यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हाच धागा पकडून एक ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात,”अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा”.
अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा pic.twitter.com/2QxhYD8OeR
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 25, 2022
यापूर्वी राज ठाकरेंनी देखील एक ट्विट केले होते ज्यात त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर भाष्य केले होते. “एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशीबालाच स्वतःच कतृत्व समजू लागतो त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो”. यानंतर आता संदीप देशपांडे यांनी ट्विट करत जणू मार्मिकपणे सूचक इशारा दिला आहे. अनेक मनसैनिकांनी हे ट्विट शेअर केले आहे.