पुणे – अभिनेते शरद पोंक्षे यांनी एका कार्यक्रमादरम्यान नाव न घेता काँग्रेसच्या राहुल गांधींवर टीका केली होती. या टिकनेनंतर पोंक्षे हे चांगलेच चर्चेत आले होते.पोंक्षेनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आले. आता डॉ. विश्वंभर चौधरी यांनी देखील पोंक्षेंचा समाचार घेत त्यांना थेट चर्चेसाठी आव्हान दिल आहे.
पोंक्षे या जाहीर चर्चेला. कधीही कुठंही. नागपूरच्या संघ मुख्यालयात किंवा सनातनच्या गोव्याच्या मठात किंवा भाजपांकित कोणत्याही चॅनलवर… कुठे ही या, शस्त्र घेऊन या, मी निःशस्त्र येतो. अशा आशयाची पोस्ट चौधरी यांनी सोशल मीडियावरून केली आहे. दहशतवाद विरुद्ध संविधान अशा हेडींगच्या आशयाखाली चौधरी यांनी हा मजकूर लिहिला आहे.
काय म्हंटलंय चौधरींनी नेमकं आपल्या पोस्टमध्ये
दहशतवाद विरूद्ध संविधान…
पोंक्षे या जाहीर चर्चेला. कधीही कुठंही. नागपूरच्या संघ मुख्यालयात किंवा सनातनच्या गोव्याच्या मठात किंवा भाजपांकित कोणत्याही चॅनलवर… कुठे ही या, शस्त्र घेऊन या, मी निःशस्त्र येतो. तुम्ही मोदी शहांचे दिल्लीचे पोलीस आणि फडणवीसांचे मुंबईचे पोलीस घेऊन या. मला भीती वाटत नाही, एकटा चालत चालत येतो.असं म्हणत आहे का तयारी ? असा सवाल चौधरी यांनी विचारला आहे.
पोंक्षे नेमकं काय म्हणाले
अभिनेते शरद पोंक्षे यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती त्यावेळी ते म्हणाले होते, ही मुलं बघा आणि दिल्लीतला मुलगा बघा, या मुलांना कळतंय आणि एवढा मोठा घोडा झाला तरी अजून गोळवलकर बोलता येत नाही, अशी टीका पोंक्षे यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केली होती.त्यानंतर अनेकांनी पोंक्षेंवर निशाणा देखील साधला होता.