नवी दिल्ली – इंडिगोच्या पाटणा-दिल्ली फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचा दावा एका प्रवाशाने केला. यानंतर इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे विमान सुरक्षित लॅण्ड करण्यात आले. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. पोलिसांनी सर्व प्रवाशांना विमानाबाहेर काढले. त्यानंतर बॉम्ब निकामी पथकाने उड्डाणाची बारकाईने तपासणी केली.
मात्र, या तपासणीदरम्यान विमानात काहीच सापडले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर संबंधीत प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले.
पाटणा विमानतळावरून इंडिगो फ्लाइट क्रमांक 6ई-2126 उड्डाण करणार होते. त्यावेळी ऋषी चंद सिंग नावाच्या प्रवाशाने विमानात बॉम्ब असल्याचा दावा केला. त्यानंतर उड्डाण रद्द करून संपूर्ण विमानाची तपासणी करण्यात आली. बॉम्ब निकामी पथकानेही बारकाईने तपासणी केली. परंतु फ्लाइटमध्ये काहीही आढळले नाही.
दरम्यान, विमानात बॉम्ब असल्याचा दावा करणारा प्रवासी ऋषीचंद सिंग हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचा विमानतळ पोलिसांनी दावा केला आहे. तसेच शोध मोहीम पूर्ण झाल्यानंतर उड्डाण करण्यात आले.