नवी दिल्ली – राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदी निवड झाली आहे. येत्या 25 तारखेला त्या देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. मुर्मू यांनी एकतर्फी विजय संपादन केला असला तरी त्यांना केरळ या राज्यातून मात्र एकच मत मिळाले आहे. या राज्यात डाव्या आघाडीची सत्ता असून कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी विरोधात आहे. दोन्ही आघाड्यांनी विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला होता. तसेच केरळमध्ये भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार नसला तरी मुर्मू यांना एक मत मिळाले आहे.
140 सदस्यसंख्या असलेल्या केरळच्या विधानसभेतील एका आमदाराचे मत मुर्मू यांना मिळाले आहे. ते चुकून दिले गेले की ठरवून याची आता चर्चा सुरू आहे. बाकीच्या राज्यांमध्ये मात्र मुर्मू यांना भरघोस पाठिंबा मिळाला आहे. भाजप आणि मित्रपक्षांसोबतच जे पक्ष भाजपसोबत नाहीत त्यांचीही मते मुर्मूंना मिळाली आहे.
सिन्हांना तिन राज्यांत शून्य मते
माजी केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव झाला आहे. त्यांना केवळ 35 टक्के मिळाली आहेत. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच मुर्मू यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर सिन्हा आणि मुर्मू यांच्यातील अंतर वाढतच गेले. आंध्र प्रदेश, नागालॅंड आणि सिक्किम या तीन राज्यांत तर सिन्हांना एकही मत मिळाले नाही. आंध्र प्रदेश विधान सभेची सदस्यसंख्या 173, नागालॅंडची 60 तर सिक्किमची 32 आहे. यातील आंध्र आणि सिक्किमची सगळी मते मुर्मू यांना मिळाली. नागालॅंडमधील 59 मते त्यांना मिळाली तर एक मत बाद ठरले.