या वर्षीच्या आणखी एका बहुप्रतिक्षित साहसी कॉमेडी फोनभूतच्या पहिल्या लूकनंतर, एक्सेल एंटरटेनमेंटने आता चित्रपटाचे नवीन मोशन पोस्टर प्रदर्शित केले असून या मोशन पोस्टरमध्ये कतरिना कैफ, इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी चित्रपटाच्या इनसाइट वर्ल्डची झलक दाखवत आहेत.
कतरिना, ईशान आणि सिद्धांत हे मैत्रीपूर्ण त्रिकूट फोनभुतद्वारे सिनेप्रेमींचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे. नुकतेच समोर आलेले त्याचे नवीनतम मोशन पोस्टर केवळ विचित्रच नाही तर प्रत्येक प्रकारे अद्वितीय आहे, जे आपल्याला चित्रपटाच्या कथेबद्दल सांगते. नेहमीप्रमाणे यात कतरिना कैफ फ्रेश दिसत आहे, तर सिद्धांत आणि ईशानचा लूकही खूपच आकर्षक आहे.
फोनभूतची निर्मिती करणारी एक्सेल एंटरटेनमेंट फोनभूतच्या नवीन मोशन पोस्टरचे अनावरण करून जिंदगी ना मिलेगी दोबारा चा 11 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या आगामी साहसी कॉमेडीचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे.