शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गटाला पाठींबा देत भाजपने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री केलं आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानव लागलं. मात्र देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाही उलट कोणतंही पद स्वीकारणार नाहीत याची माहिती आपल्याला आधीच होती असा दावा मिसेस उपमुख्यमंत्री अर्थात अमृता फडणवीस यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस आणि आमची भेट रात्री उशिरा व्हायची अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली होती.अमृता फडणवीस यांनी देखील शिंदे आणि फडणवीसांच्या भेटीबाबत भाष्य केलं आहे. देवेंद्रजी रात्री वेष बदलून शिंदेंना भेटायला जायचे. हुडी आणि गॉगल घातलेले देवेंद्रजी मलाही ओळखू येत नसल्याचे देखील अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
विरोधी पक्षनेते असताना देखील देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी लढा दिला. देवेंद्रजींनी दाखवून दिलं की पदापेक्षा ते महाराष्ट्राचं हित पाहतात. त्यांनी हसतमुखाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं. याचा मला अभिमान आहे. कारण देवेंद्रजी नेहमी पदाच्या पलिकडे जात जनतेच्या हिताची कामं करतात असं देखील अमृता फडणवीस म्हणाल्या.