उदयपूर- भारतीय जनता पार्टीच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकणाऱ्या एका हिंदु दुकानदाराची राजस्थानातील उदयपूर येथे मुंडके छाटून हत्या करण्यात आली आहे.
संबंधित दुकादाराची हत्या करतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला असून एका अन्य व्हिडिओत दोन व्यक्ती हत्येची कबुली देताना आणि हत्येसाठी वापरेले शस्त्र दाखवताना दिसत आहेत.
एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार संबंधित दुकानदाराच्या 8 वर्षीय मुलाने नुपूर शर्मा यांच्या समर्थनाची एक पोस्ट टाकली होती. त्यानंतर दोन व्यक्तींनी त्याच्या वडिलांची अर्थात या दुकानदाराची हत्या केली.