मुंबई – अभिनेता रणबीर कपूरचा आगामी ‘शमशेरा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज आहे. हा चित्रपट 22 जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर आतापर्यंतच्या सर्वात वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.
चित्रपटातील रणबीरचा रफ अँड टफ लूक पाहून लोकांना घाम फुटू शकतो. मात्र टीझर आल्यानंतर हा चित्रपट कोणाचा आहे, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. याचा काही खऱ्या घटनेशी संबंध आहे का? याबाबत रणबीर कपूरने स्वतः एकदा सांगितले होते.
शमशेरा चित्रपटात रणबीर डाकू झाला आहे आणि डाकूही असा आहे, की बघून लोकांचा श्वास थांबेल. या चित्रपटाविषयी मीडियाशी बोलताना रणबीर कपूरने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते – शमशेरा ही एका लुटारूची कथा नाही तर 1800 च्या दशकावर आधारित चित्रपट आहे. हे एका डाकू टोळीबद्दल आहे, जे त्यांचे हक्क आणि स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढले.
रणबीर कपूरनेही मुलाखतीत म्हटले होते,’मी केलेल्या चित्रपटांपेक्षा ही खूप वेगळी स्टोरी आहे. ही तरुण प्रेमी मुलाची भूमिका नाही, जी मी अनेकदा केली आहे.
चित्रपटात अनेक फ्लेवर्स पाहायला मिळणार
चित्रपटाच्या उत्कट कथेत प्रेमकथाही पाहायला मिळणार आहे. यावर रणबीर म्हणाला,’हा एक खरा हिंदी चित्रपट आहे, ज्यामध्ये कॉमेडी, अॅक्शन, रोमान्स, ड्रामा सर्वकाही आहे. या सर्व गोष्टींचा चित्रपटात समावेश करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’
लांब केस, दाढी आणि मिशामध्ये रणबीर
शमशेरामधील रणबीरचा लूक समोर आला आहे. लांबसडक केस, दाढी-मिशा आणि डोळ्यांची खोली यामुळे रणबीरचा लूक चर्चेत आहे. रणबीरला या रफ लूकमध्ये पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा यांनी केले आहे.या चित्रपटात रणबीर कपूरशिवाय वाणी कपूर आणि संजय दत्त देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.