मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री आणि चाहत्यांची आवडती शहनाज गिलचा रॅम्प व्हिडिओ सध्या सोशलवर चांगलाच चर्चेत आला आहे. बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाजने डिझायनर सामंत चौहानसाठी सुंदर वधूच्या रूपात रॅम्प वॉक करतांना दिसत होती.
View this post on Instagram
शहनाजने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. शहनाजने पूर्ण आत्मविश्वासाने रॅम्प वॉक करत अनेक सुंदर पोझ दिल्या. तिने सिद्धू मूस वालाच्या ‘सोहने लगदे’ या गाण्यावर शोस्टॉपर म्हणून डान्स करून फॅन्सची मने जिंकली.
View this post on Instagram
तिच्या व्हेरिफाईड इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करताना शहनाजने लिहिले की, “डेब्यू वॉक! सुपर टॅलेंटेड डिझायनर सामंत चौहानसाठी हा वॉक केलाय.” प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे.
View this post on Instagram
शहनाज गिलचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘बिग बॉस’च्या दिवसांमध्ये शहनाजचा निरागसपणा सलमानला नेहमीच आवडायचा. बिग बॉस दरम्यान शहनाजने लाखो चाहते बनवले होते.
अलीकडेच पंजाबी चित्रपट ‘हौसला रख’ मध्ये दिलजीत दोसांझसोबत शहनाज दिसली होती. शहनाज 30 डिसेंबर 2022 रोजी रिलीज होणाऱ्या ‘कभी ईद कभी दिवाळी’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.