नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर त्यांच्या वक्तव्याने किंवा त्यांच्या कृतीमुळे वारंवार चर्चेत राहिले आहेत. थरूर नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल होताना आपण पाहिले आहे. मात्र आता शशी थरुर यांना त्यांच्या ट्विटरला शेअर केलेल्या फोटोमुळे नेटकऱ्यांच्या रंगाचा सामना करावा लागत आहे.
एका सेल्फीमुळे शशी थरुर सध्या सोशल मीडियावर ट्रोल होताना पाहायला मिळत आहे. यात नेटकरी आपला संताप व्यक्त करत आहेत. शशी थरूर यांनी काढलेल्या सेल्फीमध्ये कपड्यांवर उलटा तिरंगा लावल्याचे दिसत आहे. त्यांचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी त्यांच्यावर सडकून टीका करताना दिसून येत आहे.
And I even took selfies that didn’t involve other people! pic.twitter.com/lf8tt4pmaz
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) June 9, 2022
सर्वसामान्यच नाही तर लडाखच्या भाजपा खासदारानेही या फोटोवरुन टोला लगावला आहे. शशी थरुर यांनी ट्विटरला फोटो शेअर करताना, “इतर लोक सहभागी नसलेले सेल्फीही मी घेतले” असे म्हटले होते. मात्र यावेळी नेटकऱ्यांची नजर त्यांच्या जॅकेटवरील तिरंग्यावर गेली. शशी थरुर यांनी तिरंगा चुकीच्या पद्धतीने लावला होता. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
🇮🇳 तिरंगा सिधा होना चाहिए, भाड में जाए कांग्रेस
Bharat Mata Ki Jai! pic.twitter.com/khKplBUv0k
— Jamyang Tsering Namgyal (@jtnladakh) June 10, 2022
लडाखचे भाजपा खासदार जामयांग तसेरिंग नामग्याल यांनी तर तिरंगा योग्य पद्दतीत दाखवण्यासाठी शशी थरुर यांचा उलटा फोटो ट्विटरला पोस्ट केला. ‘तिरंगा सरळ असला पाहिजे, खड्ड्यात गेली काँग्रेस’ असे कॅप्शनही त्यांनी फोटोसोबत दिले आहे.
Please fix the national flag which you wear! You are patriotic person, i expect right things from you. Thank you
— Pratik R Vaishnani પ્રતિક વૈશ્ર્નાણી (@ipspratikpatel) June 9, 2022
एका युजरने शशी थरुर यांनी तिरंगा उलटा लावण्यांचं कारण काय? अशी विचारणा केली आहे. तर सत्येंद्र नावाच्या एका व्यक्तीने साधं तिरंगा कसा लावायचा हे माहिती नाही का? अशी विचारणा करताना तिरंग्याचा अपमान केल्याबद्दल कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
झंडा तो सही लगाना सीखिए थरूर साहब 😂😂😂 pic.twitter.com/lK1oGU4LS5
— Savage_Shivam_🇮🇳⚡ (@SavageShivam) June 9, 2022
यावेळी काही युजर्सनी शशी थरुर यांच्या निमित्ताने काँग्रेस पक्षावरही निशाणा साधला आहे. विशाल गुर्जर नावाच्या युजरने ज्या व्यक्तीला तिरंग्याबद्दल माहिती नाही, त्याचा पक्ष देश कसा चालवणार? अशी विचारणा केली आहे. शशी थरुर यांचे हे फोटो इटली दौऱ्यातील आहेत. ट्विटरला त्यांनी आपले इटलीमधील फोटो शेअर केले आहेत. यावेळी काहीजणांनी त्यांना चूक होती, माफी मागून टाका असा सल्लाही दिला आहे.