मुंबई – बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहात आहे. विकी कौशल-कतरिना कैफपासून ते रणबीर कपूर-आलिया भट्टपर्यंत अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी आता लग्नगाठ बांधली आहे. अशातच अभिनेता अर्जुन कपूर व अभिनेत्री मलायका अरोरा लग्गगाठ बांधणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बॉलिवूडचे सर्वात लोकप्रिय जोडपे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अर्जुन-मलायका गेल्या चार वर्षांपासून नात्यात आहेत. त्यांच्या लग्नांची चाहत्यांना अनेक दिवसांपासून उत्सूकता होती. अखेर हे जोडपे लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन आणि मलायका 2022 च्या अखेरीस लग्न करणार आहेत. मिळालेल्या माहितीनूसार हे दोघे ग्रँड लग्न करू इच्छित नाहीत. या दोघांनाही रजिस्टर विवाह करायचा आहे. मात्र मित्रासांठी पार्टीचे आयोजन केले जाणार आहे.
दरुम्यान, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत चाहत्यांशी संवाद साधत असतात. अनेकवेळा त्यांना त्यांच्या लग्नाबाबत विचारलं जातं. या दोघांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची प्रचंड उत्सुकता आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा गेल्या काही वर्षां पासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी 2019 मध्ये त्यांचे नाते अधिकृत केले होते आणि तेव्हापासून ते सोशल मीडियावर एकमेकांसोबत रोमँटिक फोटो शेअर करत असतात.