मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू प्रत्येक वेळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आश्चर्यचकित करते. प्रत्येक वेळी ती वेगळा चित्रपट घेऊन येते, जे पाहून सर्वजण तिची प्रशंसा करू लागतात. याआधी तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांचा पुन्हा एकदा ‘दोबारा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तापसी आणि अनुराग यांनी एकत्र काम केले असून चित्रपटाची प्रदर्शनाची तारिख समोर आली आहे.
तापसीचा चित्रपट दोबारा चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज असून चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. या चित्रपटात तापसीसोबत अभिनेता पवैल गुलाटी दिसणार आहे. दोघांनी यापूर्वी थप्पडमध्ये एकत्र काम केले आहे.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर दोबारा रिलीज डेटची माहिती दिली आहे. तापसी आणि पवैलचा एक फोटो शेअर करत त्याने लिहिले, तापसी आणि अनुराग कश्यप यांच्या दोबारा या चित्रपटाची रिलीज डेट निश्चित झाली आहे. हा चित्रपट 19 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर, शोभा कपूर, गौरव बोस आणि सुनीर खेत्रपाल यांनी केली आहे.
View this post on Instagram
‘दोबारा’ हा नवीन काळातील थ्रिलर चित्रपट आहे. तापसी आणि अनुरागचा हा तिसरा प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये ते एकत्र काम करत आहेत. त्याचवेळी थप्पडनंतर तापसी आणि पवैलची जोडी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. थप्पडमधील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षाकांच्या पसंतीस पडली आहे. आता ही जोडी पुन्हा 19 ऑगस्टला दिसणार आहे.