मुंबई : एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन औवेसी हे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर असून त्यांचा हा दौरा अत्यंत वादग्रस्त ठरत असल्याचे दिसत आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले त्यावरून राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांसह विरोधकांनी देखील या कृतीवर संताप केला आहे. दरम्यान, भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी याबद्दल ट्वीट करत ओवेसीला कडक इशारा दिला आहे.
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी याबद्दल ट्वीट करत ओवेसीला इशारा दिला आहे. “मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!” असं ट्वीट करत त्यांनी इशारा केला आहे.
मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा..
याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..
आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!— nitesh rane (@NiteshNRane) May 13, 2022
नितेश राणेंनी या संदर्भात दुसरे ट्विट केले असून ते राज्य सरकारवर टीका करणारे आहे. “या कारट्या ओवैसीला माहिती आहे का? की, मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नागडा नाचलो तरी, मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्यामध्ये “नामर्दांचे सरकार आहे”…” असे म्हणत त्यांनी सरकारवरही टीकास्त्र सोडले आहे.
या कारट्या ओवेसी ला माहीत आहे की,
मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्या मध्ये "नामर्दांचे सरकार आहे"…याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व!! pic.twitter.com/FB7pVSOraE
— nitesh rane (@NiteshNRane) May 13, 2022
त्याबरोबर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी औरंगजेबच्या कबरीवर माथी टेकणाऱ्यांना त्याच कबरीत गाडू असे म्हणत ओवेसींवर टीका केली आहे. तसेच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही ओवैसी यांच्यावर टीका केली आहे.