मुंबई – बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने नुकताच मुलगी इरा खानचा वाढदिवस साजरा केला आहे. इराच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होताना दिसून येत आहेत. या फोटोची सद्या जोरदार चर्चा होत असून नेटकऱ्यांनी अभिनेत्यास ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
आमिरची मुलगी इराने रविवारी 8 मे रोजी तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला, दरम्यान वाढदिवसाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्याने आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त पूल पार्टीचे आयोजन केल्याचे चित्र पाहताना दिसत आहे. यावेळी इरा बिकिनीमध्ये केक कापताना दिसून आली आहे. त्यामुळे इराच्या याच बिकिनीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोत आमिरही शर्टलेस दिसत आहे, तर मुलगा आझादही त्याच्यासोबत दिसत आहे.