मुंबई – ‘१८५७ च्या उठावात पण फडणवीसांचे योगदान असेल ! इति आदित्य ठाकरे. बाकी बायकी टोमणे मारण्यात मुलगा बाप से बेटा सवाई दिसतोय’ भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.
अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यासंदर्भातील विषयावरुन शिवसेना आणि भाजपा यांच्यात सध्या शाब्दिक चकमक होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राममंदिर आंदोलना मध्ये शिवसेनेचा एकही नेता किंवा शिवसैनिक त्या ठिकाणी नव्हता असा त्यांनी जाहीर सभेमधून केला होता.
त्यांच्या या दाव्यावर आता शिवसेनेकडून सडेतोड उत्तर देण्यात येत आहे. राज्याचे पर्यटनमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. त्यावर आता भाजपकडून प्रतिउत्तर देण्यात आले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासह भाजपकडून अनेक प्रतिक्रिया आता उमटत आहेत.
काय आहे चित्रा वाघ यांचे ट्विट
१८५७ च्या उठावात पण फडणवीसांचे योगदान असेल ! इति आदित्य ठाकरे.
बाकी
बायकी टोमणे मारण्यात मुलगा बाप से बेटा सवाई दिसतोय…. pic.twitter.com/0ccxZ0sctE— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 3, 2022