जालना – जालन्यात बेकायदेशीर गर्भपात सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला असून या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी आज सांगितले.
आरोग्य अधिकारी आणि पोलिसांनी शुक्रवारी घातलेल्या ढवळेश्वर भागात घातलेल्या धाडीमध्ये एक नवजात स्त्री अपत्, गर्भपात उपकरणे आणि रजिस्टर जप्त करण्यात आली. यावेळी गर्भपातासाठी दाखल झालेल्या महिलेला जवळच्या दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. बीएमएएस डॉक्टर असलेला या प्रकरणातील आरोपी सोनाग्राफी मशिनसह छापा सुरू असतानाच पळून गेला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बेकायदेशीरपणे गर्भपात होत असलेल्या या सेंटरबाबतची तक्रार 25 एप्रिल रोजी पुण्यातील राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाला प्राप्त झाली होती. त्या आधारे जालना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, सिव्हील सर्जन अर्चना भोसले आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती.
या ठिककाणी बेकायदेशीरपणे गर्भपात करण्यासाठी 40 हजार रुपये आकारले जात असल्याचे आढळून आले आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.