गोवाहटी – आम आदमी पार्टीला भाजप सहज हाताळू शकते. त्यामुळे कॉंग्रेस ऐवजी आम आदमी पार्टीला पर्याय म्हणून भाजप पुढे आणू पहात आहे, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस पक्षाचे संसदेतील संख्याबळ आता खूपच घटले आहे. मात्र तरिही कॉंग्रेसचा वारसा मोठा आहे. त्यामुळेच भाजप कॉंग्रेसला अजूनही घाबरत आहे, असेही खुर्शिद यांनी म्हटले आहे. “आप’ हा चांगला सल्लागार होऊ शकते, असे भाजपच्या ध्यानात आले आहे. त्यामुलेच भाजप “आप’ला सहज हाताळू शकते. मात्र भाजप कॉंग्रेसला हाताळू शकत नाही. न्हणूनच कॉंग्रेसच्या ऐवजी “आप’ला पर्याय म्हणून पुढे आमले जात आहे, असे खुर्शिद यांनी म्हटले आहे.
अजूनही देशातील जनता कॉंग्रेसच्या बरोबर आहे. या पक्षासाठी जे काही करणे गरजेचे आहे ते आम्ही करायला तयार आहोत. भाजपकडून केवळ अुपप्रचार केला जाऊ शकतो, असेही खुर्शिद म्हणाले.
कॉंग्रेस पक्षामध्ये सध्या नेतृत्वाचा कोणताही वाद नसून जो काही वाद आहे तो केवळ देशातील राजकारणाच्या नेतृत्वावरील वाद सुरू आहे, असेही कुर्शिद म्हणाले.