पुणे – फर्ग्युसन कॉलेज येथे रिक्षाने जाता असताना रिक्षामध्ये बसले असता आरोपी रिक्षा चालक तसेच पाठीमागील बाजुस बसलेल्या इसमाने तरुणीच्या गळयात हात टाकुन तीचा विनयभंग केला तसेच तीला जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निर्भया महाविद्यालयात जात होती, रिक्षात मागे बसलेल्या इसमाने तीचा विनयभंग केला. त्यानंतर निर्भयाने रिक्षा चालकास रिक्षा थांबवण्यास सांगितले असता त्याने रिक्षा कमी वर्दळीच्या भागात थांबवुन तरुणीचा पाठलाग केला व तिचे दोन्ही हात पकडुन तिचा शेजारी बसलेल्या इसमाने तिच्या सोबत बळजबरी केली. यावेळी निर्भयाने आरडा ओरडा केला तेव्हा आरोपीने पेटत्या सिगारेटचा तिच्या डाव्या हाताच्या दंडाला चटके देऊन जखमी केले व छातीत व पोटात लाथाबुक्यांनी मारहाण करुन रिक्षा घेऊन पळुन गेले.