कांगो – आफ्रिकन देश कांगोमध्ये रेल्वे रुळावरून घसरून झालेल्या भीषण अपघातात 61 नागरिकांचा मृत्यू, तर 52हून अधिक जण जखमी झाले आहेत. यामध्ये काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हा अपघात बुयॉफ्वे गावाजवळ घडला.
ही रेल्वे 15 डब्यांची मालवाहू रेल्वे होती. यातील 12 डबे रिकामे होते. तर बाकीच्या तीन डब्यांमध्ये सामान ठेवलेले होते. रिकाम्या डब्यांमध्ये लोक अवैधरित्या प्रवास करत होते. हा अपघात झाल्यानंतर रेल्वेचे काही डब्बे थेट दरीत कोसळले.
यामुळे कोसळलेल्या डब्यांतेदखील काही लोकांचे मृतदेह अडकले होते, अशी माहिती रेल्वे अधिकारी नदांबो यांनी दिली. दरम्यान कांगो या देशामध्ये पुरेशा प्रवासी रेल्वेगाड्या नसल्यामुळे येथील लोक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मालवाहू रेल्वेने प्रवास करतात.