मुंबई – आजोबा वसंतराव देशपांडे यांच्या शास्त्रीय संगीताचा वारसा ‘राहुल देशपांडे’ गेले अनेक वर्ष समर्थपणे पुढे नेत आहेत. आपल्या गायकीमधील नाविण्य ते प्रेक्षकांसमोर सादर करत आहे. आता ‘मी वसंतराव’ या चित्रपटातून ते अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. विशेष म्हणजे आजोबांचीच वसंतराव देशपांडे यांची भूमिका स्वतःहा राहुल देशपांडे साकारत असल्याने प्रेक्षकांसाठी हा दुग्धशर्करा योग असेल हे नक्की.
View this post on Instagram
पंडित वसंतराव देशपांडे हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील मोठे नाव आहे. ठुमरी, दादरा आणि गझल हे हिंदुस्तानी गायकीचे प्रकार त्यांनी अत्यंत सहजतेने सादर केले आहेत. आणि आता त्यांचाच जीवन प्रवास राहुल देशपांडे रुपेरी पडद्यावर रंगवणार आहे. करोना महामारीमुळे हा चित्रपट लांबणीवर गेला होता. मात्र, आता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच 1 एप्रिल रोजी ही सुरांची मैफल प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. या चित्रपटाचा टिझर आज प्रदर्शित झाला आहे.
‘मी वसंतराव’ या चित्रपटात राहुल देशपांडे सह अनीता दाते, निपुण धर्माधिकारी, कौमुदी वलोकर, पुष्कराज चिरपुटकर, अमेय वाघ या सारखे तगडे कलाकार यामध्ये असल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भातील एक पोस्ट सुद्धा राहुल देशपांडे यांनी आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.