मुंबई – श्रीलंकेविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचेही कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपविले आहे . मोहालीत १००वा कसोटी सामना खेळण्यासाठी अनुभवी फलंदाज विराट कोहली ट्वेन्टी-२० मालिकेतून विश्रांती घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर येत आहे.
चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ राष्ट्रीय निवड समिती येत्या काही दिवसांत श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि केएल राहुल ट्वेन्टी-२० मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमीचे संघात पुनरागमन निश्चित मानले जात आहे.
मैदानावरून..
रोहित शर्मा कसोटीसाठी कर्णधार
जसप्रीत बुमरा उपकर्णधार
अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, वृद्धिमान साहला वगळले
केएस भरत, प्रियांक पांचाळ, सौरव कुमारला संधी
रविंद्र जडेजाचे पुनरागमन, कसोटीसाठी कुलदीपला संधी
श्रीलंकेविरुद्धचा भारतीय संघ –
रोहित शर्मा कप्तान, मयंक अग्रवाल, प्रियंक पांचाल, विराट कोहली , श्रेयस अय्यर, हनुमा विहार, शुबमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, आर अश्विन (फिटनेस), जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (वाईस), मोहम्मद शमी, सिराज, उमेश यादव, सौरव कुमार