मुंबई – भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना आमने-समाने आले आहेत. भाजपकडून माजी खासदार किरीट सोमय्या तर शिवसेनेकडून संजय राऊत आघाडीवर आहेत. आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्यांवर कडाडून टीका केली आहे. मागील चार दिवसांपासून रोज एक प्रकरण मी देतोय. पालघरला वेवूर नावाच्या गावात सोमय्या यांच्या मुलाचा २६० कोटींचा प्रोजेक्ट सुरू आहे. त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या त्या प्रकल्पावर संचालक आहेत. या २६० कोटींमध्ये ईडीचे एक संचालक आहेत. हे कोट्यवधी रुपये यांच्याकडे येतात कुठून? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केलाय. यावेळी राऊत यांनी सोमय्या यांनी इशाराही दिला. तुमचं असेल केंद्रात सरकार. पण महाराष्ट्र सरकार मजबूत आहे. आमच्या हातात देखील बरंच काही आहे. त्यामुळे पोकळ धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नका, त्यात तुम्हीच फसणार आहात, असा इशारा राऊतांनी दिला. दरम्यान ईडी, सीबीआयच्या कितीही धमक्या दिल्या तरी आम्ही घाबरत नाही. “रिश्ते में हम आपके बाप लगते है” अस म्हणत बाप काय असतो, हे तुम्हाला यापुढे रोज दिसेल, असंही राऊत यांनी म्हटलं.