पुणे – आईवर करणी झाल्याचे सांगून एका भोंदू बाबाने अघोरी प्रकार करीत, दुसर्याने अश्लिल चाळे करून तब्बल 50 लाख 30 हजार रूपये घेऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक सुसंस्कृत पुण्यात घडला. याप्रकरणी एका भोंदू बाबासह दोघांना खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
राजेंद्र बलराम कन्ना (45, रा. गंजपेठ) आणि मनिष बापूराव शिंदे (42, रा. देहूरोड, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबात एका 35 वर्षीय महिलेनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विनयभंग, फसवणूक, संगणमत करणे, धमकावणे आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे 2018 ते 2019 या कालावधीत भोंदूगिरी करणार्या राजेंद्र कन्ना याने फिर्यादीला त्यांच्या आईवर नातेवाईकांनी करणी केले असल्याचे सांगितले. त्यांच्या आईवरील करणी काढण्यासाठी त्याने जादु टोणा करण्यासाठी कागदी चिठ्ठ्या तयार केल्या.
काळी बाहुली, लिंबू, हळद, कुंकु, लिक्वीउ याचा वापर करून होमहवन केले. तसेच बोकडाचा स्मशानभुमीत बळी देण्यासाठी जादु टोण्यासारखे अघोरी कृत्य करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून वेळावेळभ रोख रक्कम 50 लाख 30 हजार घेऊन त्यांची फसवणुक करून आरोपी मनिष शिंदे याने कन्ना याच्याकडून पैसे काढून देतो असे फिर्यादीसोबत वेळोवेळी अश्लिल चाळे करून विनयभंग केला. याबाबत कोणास सांगण्यास व तक्रार न देण्यासाठी धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.