नवी दिल्ली – भारत सरकारने सन 2017 साली इस्त्रायलशी जो संरक्षण विषयक करार केला होता त्यात पेगासस हे हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर खरेदी केले होते असा गौप्यस्फोट न्युयॉर्क टाईम्सच्या वृत्तात करण्यात आला आहे. त्यामुळे मोदी सरकारपुढील अडचण वाढली आहे. मुळात भारताने हे सॉफ्टवेअर खरेदीच केलेले नाही अशी भूमिका सरकारने प्रथम मांडण्याचा प्रयत्न केला होता. पण विदेशातील काहीं संस्थांनी त्या विषयीची माहिती पुढे केल्यानंतर सरकारला बचावात्मक स्थितीत जावे लागले होते. यावरून विरोधकांनी मोदींवर टीका केला आहे. तर भाजप खासदाराने देखील मोदी सरकारला घरचा आहेर दिला आङे.
संरक्षण विषयक कराराद्वारे हे हेरगिरीचे सॉफ्टवेअर खरेदी केले गेले आणि ते देशातील पत्रकार, उद्योगपती, विरोधी पक्षांचे नेते यांच्यावर वापरले गेले असे स्पष्ट झाल्याने सरकार त्यावर काय खुलासा करणार या विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
Modi government must rebut New York Times revelations today that It did indeed subscribe by payment from tax payers money of ₹ 300 crores to spyware Pegasus sold by Israeli NSO company. This implies prima facie our Govt misled Supreme Court and Parliament. Watergate ?
— Subramanian Swamy (@Swamy39) January 29, 2022
यावरून भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं की, मोदी सरकारने करदात्यांचे तीनशे कोटी रूपये खर्चुन हे हेरगिरी करणारे तंत्रज्ञान खरेदी केले आणि त्याचा गैरवापर करून विरोधीपक्ष नेते आणि अन्य लोकांची हेरगिरी केली असे न्युयॉर्क टाईम्सच्या वृत्ताने स्पष्ट झाले आहे. त्या संबंधात मोदी सरकारने त्वरीत खुलासा केला पाहिजे. या संबंधात सरकारने संसदेची व आपल्या न्याय व्यवस्थेची दिशाभुल केली आहे असे सकृत दर्शनी दिसून आले आहे. हा एक वॉटरगेट स्वरूपाचा मोठा गफला आहे काय ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.