मुंबई – देशात 4 जीची सेवा मुख्य शहरात सुरळीत पणे सुरु आहे. आता ती शहरे 5 जी सेवेची प्रतिक्षा करत आहेत. बाजारात सर्वत्र 5 जी स्मार्टफोन सुद्धा आले आहेत. आता लवकरात लवकरत 5 जी नेटवर्क देखील सुरू व्हावं अशी वापरणाऱ्यांची इच्छा आहे. परंतू 5 जी सेवेमुळे निर्माण होणाऱ्या वेगळ्याच अडचणीचा सामना सध्या भारत, अमेरिका आणि जपान आदी देशांना करावा लागत आहे. याचा परिणाम थेट हवाई वाहतुकीवर पडताना दिसत आहे. अनेक विमानांची उड्डाणं 5 जी टेक्नॉलॉजीमुळे रद्द करावी लागत आहेत.
एअर इंडियाचा इशारा
भारतीय विमान कंपनी एअर इंडियाने ट्विट करून म्हटले की, अमेरिकेच्या विमानतळांवर आज 5 जी कम्युनिकेशन डिप्लॉय करण्यात येणार आहे. या इंटरनेट सेवेचा थेट परिणाम विमानांच्या उड्डाणांवर होईल.
विमानांच्या कंट्रोल सिस्टिमवर होईल. 5जी नेटवर्कमुळे विमानावर नियंत्रण ठेवणे अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे एअर इंडियाने भारतातून अमेरिकेत जाणारी अनेक उड्डाणं रद्द केली आहेत.
#FlyAI: Due to deployment of the 5G communications in USA,we will not be able to operate the following flights of 19th Jan’22:
AI101/102 DEL/JFK/DEL
AI173/174 DEL/SFO/DEL
AI127/126 DEL/ORD/DEL
AI191/144 BOM/EWR/BOMPlease standby for further updates.https://t.co/Cue4oHChwx
— Air India (@airindiain) January 18, 2022
अमेरिकेच्या विमानतळांना 5 जी सेवेचे बफर झोन बनवण्यात आले आहे. यामुळे या अडचणी येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 5 जी मुळे विमानांच्या altimeters वर परिणाम होऊ शकतो. हे असे उपकरण असते, की ज्यामुळे कोणत्याही स्थानाची उंची मोजता येते.
विमान कंपन्यांचे म्हणणे आहे की, 5 जी टेक्नॉलॉजीमुळे लो विजिबिलीटी ऑपरेशंन्समध्ये मोठी अडचण निर्माण होऊ शकते. तसेच विमानाचे इंजिन आणि ब्रेकिंग सिस्टिमवर लॅंडिंग मोडवर जाण्यासही अडथळा निर्माण होऊ शकतो.