बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे लवकरच शकुन बत्रा यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंगही काही दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात आले आहे. या चित्रपटाची बऱ्याच महिन्यांपूर्वी घोषणा करण्यात आली होती; परंतु या चित्रपटाचे टायटल निश्चित करण्यात आले नव्हते.
आता या चित्रपटाचे टायटल आणि रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज करत याबाबत माहिती देण्यात आली. शकुन बत्रा यांच्या या चित्रपटाचे नाव “गहराइया’ असे ठेवण्यात आले असून तो पुढील वर्षी 25 जानेवारी 2022 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
चित्रपटाच्या या टीझरमध्ये आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या सिद्धांतसोबत दीपिका रोमांस करताना दिसून येत आहे. चित्रपटाचा टीझर शेअर करत दीपिकाने पोस्टमध्ये लिहिले की, “मेरा दिल… गहराइया 25 जानेवारीला ऍमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे.’