छत्तीसगडमध्ये मंगळवारी सकाळी नक्षलवाद्यांचा मोठा कट फसला. दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या तुकडीवर IED स्फोट केला. या स्फोटात कोणतीही मोठी हानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे. मात्र, एक जवान किरकोळ जखमी झाला आहे. दंतेवाडा एसपीने सांगितले की, नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला करण्याचा इरादा होता यासाठी त्यांनी आयईडीचा वापर केला.
एसपी अभिषेक पल्लव यांनी सांगितले की, हा हल्ला सकाळी आठ वाजता झाला. त्यावेळी सर्व जवान बोदली कॅम्पवरून करियामेटच्या दिशेने ऑपरेशनसाठी रवाना झाले होते. छावणीपासून सुमारे 650 मीटर अंतरावर नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला. ज्यामध्ये एक जवान जखमी झाला आहे. इतर सर्व जवान सुरक्षित आहेत. एसपी अभिषेक पल्लव यांनी सांगितले की, झडतीदरम्यान घटनास्थळावरून चार जिवंत आयईडी बॉम्ब सापडले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.