नवी दिल्ली – काल सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर आज सोन्याचे दर 119 रुपयानी कमी होऊन 46,613 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.
दिल्ली सराफात तयार चांदीचा दर 517 रुपयानी कमी होऊन 61,671 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात बुधवारी सोन्याचे दर स्थिर राहिले.
महागाई वाढण्याच्या शक्यतेमुळे आगामी काळात गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक वाढविण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये सोन्याचे दर उच्च पातळीवर राहू शकतात