पुणे – उच्च शिक्षण विभागाच्या बीए-बीएस्सी बीएड आणि बीएड-एमएड या एकात्मिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
पात्र, विद्यार्थ्यांना दि. 29 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना 29 नोव्हेंबरपर्यत अर्जासह कागदपत्रे अपलोड करायचे आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे पर्यायही भरायचे आहेत. त्यानंतर 2 डिसेंबरपर्यंत अर्जांची छाननी करण्यात येईल. विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी 6 डिसेंबरला प्रसिद्ध होईल.
या गुणवत्ता यादीबाबतचे आक्षेप 7 आणि 8 डिसेंबर या कालावधीत नोंदवता येईल. त्यानंतर 10 डिसेंबरला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. महाविद्यालयचे 14 डिसेंबरला जाहीर झाल्यानंतर 15 ते 18 डिसेंबरदरम्यान प्रवेश निश्चित करावे लागणार आहे. त्यानंतर 21 डिसेंबरला रिक्त जागा जाहीर होतील. दुसऱ्या फेरीला 22 डिसेंबरपासून सुरूवात होईल. प्रवेशाची कट ऑफ तारीख 28 डिसेंबर राहणार आहे.