श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील पल्हालन पट्टणमध्ये जवानांवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे 2 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील पल्हालन चौकात संशयित दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. ज्या हल्ल्यात दोन निमलष्करी जवान आणि एक नागरिक जखमी झाले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवकर ग्रेनेड फेकले.
या हल्ल्यात दोन जवान आणि एका नागरिकाला गोळी लागली. या सर्वांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला असून सध्या सर्च ऑपरेशन सुरु आहे.