पुणे – मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ‘अनिकेत विश्वासराव’सह त्याचे संपूर्ण कुटुंब अडचणीत सापडेल आहे. कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याची अनिकेतच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत विश्वासराव याची पत्नी स्नेहा विश्वासराव यांनी ही तक्रार दिली आहे. अनिकेतसह सासू, सासरे यांच्यावर स्नेहाने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्या प्रकरणी पुण्यातील अलंकार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहा अनिकेत विश्वासराव यांना पती अनिकेत विश्वासराव याने 10 डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 2021 या तीन वर्षाच्या काळात सिनेसृष्टीत
आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली. तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला असे म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणात पती अनिकेत विश्वासराव याला सासरे चंद्रकांत आणि सासू अदिती यांनी साथ देण्याचे काम केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्नी स्नेहाने संपूर्ण कुटुंबाविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.