गेल्या 17 वर्षांपासून ‘फेसबुक’ एकाच नावाने ओळखले जाते, पण आता त्याच्या रि-ब्रँडिंगची तयारी सुरू आहे. फेसबुकचे नाव बदलणार आहे आणि त्याची अधिकृत घोषणा लवकरच फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग करणार असल्याची माहिती आहे. पुढील आठवड्यात फेसबुकवरील एका कार्यक्रमात नवीन नावाची घोषणा केली जाऊ शकते.
‘द व्हर्ज’च्या अहवालानुसार, 28 ऑक्टोबर रोजी एक फेसबुक परिषद होणार आहे ज्यात मार्क झुकरबर्ग फेसबुकच्या नवीन नावाची घोषणा करू शकतात. अहवालात असे म्हटले गेले आहे की फेसबुक ऍप व्यतिरिक्त कंपनीच्या इतर उत्पादनांच्या नावांविषयी मोठ्या घोषणा होऊ शकतात जसे की इंस्टाग्राम, व्हॉट्सऍप, ऑकुलस इत्यादी. या अहवालावर फेसबुककडून अद्याप कोणतीही अधिकृत टिप्पणी करण्यात आलेली नाही .
या आठवड्याच्या सुरुवातीला, फेसबुकने सांगितले की ती आता एक मेटाव्हर्स (metaverse) कंपनी बनणार आहे, ज्यासाठी त्याने 10,000 लोकांना नियुक्त केले आहे आणि भविष्यात इतर नेमणुका होतील. मेटाव्हर्स म्हणजे एक आभासी जग ज्यामध्ये लोक शारीरिकरित्या उपस्थित नसले तरीही अस्तित्वात असतात. मेटावर्स हा शब्द आभासी वास्तव आणि वर्धित वास्तविकतेसारखा (वर्चुअल रियलिटी आणि ऑग्युमेंट रियलिटी) आहे.
केवळ फेसबुकच नाही तर जगातील मोठ्या टेक कंपन्या मेटाव्हर्समध्ये गुंतवणूक करत आहेत. मार्क झुकरबर्गचा विश्वास आहे की, येत्या काळात लोकांना फेसबुक फक्त एक सोशल मीडिया कंपनी नाही तर मेटाव्हर्स कंपनी म्हणून ओळखली जाईल.
फेसबुक आपल्या वास्तविक आणि आभासी-जगाच्या अनुभवांच्या निर्माणासाठी पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती करेल. फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, इटली, नेदरलँड्स, पोलंड आणि स्पेनसह इतर देशांमध्ये या भरती मोहिमेत लोकांना नियुक्त केले जाईल.