मुंबई – जान्हवी कपूरने आपल्या अंगावर एक टॅटू केला आहे. आई श्रीदेवीच्या नावे लिहिलेल्या एका पत्राचा उल्लेख या टॅटूमध्ये आहे. तिने अलीकडेच बरेच फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्यात योगासनांचे आणि एका मंदिरात दर्शनाला जाण्याचेही फोटो आहेत.
View this post on Instagram
तिच्या दंडावर तिने एका ओळीचा टॅटू केला आहे. याचाही फोटो तिने शेअर केला आहे. “आय लव्ह यू लब्बू’ असे या टॅटूमध्ये म्हटले आहे. जान्हवीची आई श्रीदेवी जान्हवीला लाडाने लब्बू म्हणत असायची. याची आठवण या टॅटूच्या माध्यामातून सारखी जान्हवीला होत असते.
View this post on Instagram
फेब्रुवारीत श्रीदेवीच्या तिसऱ्या स्मृतिदिनामित्त जान्हवीने आईने लिहिलेल्या या एका ओळीच्या पत्राचा फोटो शेअर केला होता. आता त्याच पत्राचा टॅटू तिने आपल्या दंडावर करून घेतला आहे. “आय लव्ह यू लब्बू, यू आर द बेस्ट बेबी इन द वर्ल्ड’ असे हे पूर्ण वाक्य आहे.
View this post on Instagram
24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईमध्ये श्रीदेवीचा मृत्यू झाला होता. वर्कफ्रंटच्या बाबतीत बोलायचे तर जान्हवीने काही दिवसांपूर्वीच राजकुमार रावबरोबर “रुही’मध्ये काम केले होते. आता “गुड लेक जेरी’ चे शूटिंग तिने मार्च महिन्यात संपवले आहे. याशिवाय “दोस्ताना 2′ आणि करण जोहरच्या “तख्त’मध्येही ती असणार आहे.