सांगली – सांगलीत मैत्रिणीने प्रेमास नकार दिल्यानंतर तरुणाने हाय होल्टेज ड्रामा केल्याचा प्रकार समोर आला आहे. मैत्रिणीकडे प्रेमाची मागणी घातल्यावर तिने नकार दिलाच्या रागातून तरुणाने टेरेसवर जाऊन व्हिडिओ कॉल करत आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे.
हा तरुण इमारतीच्या संरक्षक भिंतीवर देखील चढला सुदैवाने गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्यामुळे तरुणाचे प्राण वाचले आहेत. मात्र तोपर्यंत सर्वाचा जीव भांड्यात पडला होता. हा प्रकार सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे घडला आहे.
संबंधित तरुण आपल्या राहत्या अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर जावून संरक्षक भिंतीवर चालत होता. तसेच व्हिडीओ कॉल करून मैत्रिणीला प्रेमाचा होकार मिळवण्यासाठी विनवणी करत होता. पण तिने प्रेमसंबंधाला साफ नकार देत आपण मैत्री ठेवू असे सुनावलं. त्यानंतर तरुणाने आत्महत्येचा पर्यंत केला तेवढ्यात पोलिसांनी वाचवल्यामुळे ही घटना टळली.