Navratri Special2021 : असा करा नवरात्रीत स्पेशल ‘नवरंगी डाएट’

पुणे – शारदीय नवरात्रीला (दि. 8) कालपासून सुरुवात झाली आहे. नवरात्रीत दुर्गा देवीच्या वेगवेगळ्या अवतारांची 9 दिवस पूजा करताना दररोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालतात. नवरात्रीतील 9 दिवसांमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालतात या संदर्भातील माहिती वेळोवेळी आपल्याला मिळत असते.

पण याच नऊ दिवसात असे कपडे घालण्याबरोबरच रोजच्या जेवणात सुद्धा या नऊ रंगांचा समावेश झाला तर सर्वांनाच आवडेल. चला तर मग या नवरंगामुळे शरीराला पोषकद्रव्ये मिळवून शरीर सुदृढ राखण्यास कशी मदत होईल हे पाहूया…..

दिवस पहिला (रंग पिवळा) – नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नाश्त्यामध्ये तुम्ही पोहे, हळद घालून तिखट-मिठाचा शिरा, शेवयांचा उपमा, ढोकळा असे काही पदार्थ करू शकता. तर, दुपारच्या जेवणात उकडलेल्या बटाट्याची भाजी, ताकाची कढी, पिठलं असे पदार्थ बनवू शकता.

दिवस दुसरा (रंग हिरवा) – दुसऱया दिवशी तुम्ही नाश्त्याला मेथीचे पराठे, हिरव्या मुगाचा ढोकळा असे पदार्थ करू शकता. तर दुपारच्या जेवणात भेंडीची तळून भाजी, दाल पालक, पोळी करता येईल. 

दिवस तिसरा (रंग करडा) – नाचणी, बाजरी पीठ एकत्र करून आंबील तिसरया दिवशी नाश्त्याला करता येईल. तर दुपारच्या जेवणात बाजरीची भाकरी, चवळीची किंवा मसुराची उसळ, भात असे प्रकार ठेवता येतील. 

दिवस चौथा (रंग केशरी) – तिसऱ्या दिवशी सकाळच्या नाश्त्याला संत्र्याचा ज्यूस, गाजराचे काप करून खाता येऊ शकतात. तर जेवणात भोपळ्याची भाजी, गाजराची कोशिंबीर, आमटी, पोळी, भात हा मेन्यू उत्तम राहील. 

दिवस पाचवा (रंग पांढरा) –  नवरात्रीच्या पाचव्या दिवशी नाश्त्यामध्ये इडली, चटणी,पांढरा ढोकळा खाता येऊ शकतो. तर दुपारच्या जेवणात तांदळाची भाकरी, तांदळाची किंवा शेवयाची खीर, नुसत्या मुळ्याची भाजी आणि रात्री झोपताना दूध पिले तर उत्तमच.

दिवस सहावा (रंग लाल) –  डाळिंब, कलिंगडाचे काप असा हलका प्रकार नाश्त्याला सहाव्या दिवशी चालू शकेल, तर जेवणात टॉमेटोची भाजी, लाल तिखट घालून केळ्याची भाजी, पोळी, भात घेता येईल.

दिवस सातवा (रंग निळा) –  हा रंग खूप विचार करायला लावणारा आहे. नाश्ता म्हणून तुम्ही नुसत्या ब्ल्यू बेरीज खाऊ शकता. किंवा गोकर्णाच्या फुलांचा वापर करून केलेले ज्यूस सध्या चलतीत आहे. जेवणात निळ्या वांग्याची भाजी, भरीत, पोळी, भात असा मेन्यू तर वांगी घालून केलेला भात रात्री खाऊ शकता.

दिवस आठवा (रंग गुलाबी) –  या दिवशी जांभळा बिटाचा पराठा हा पौष्टीक पर्याय तुम्हाला नाश्त्याला करता येईल. तर भरली वांगी, नाचणीची भाकरी, आमटी, भात असा मेन्यू दुपारच्या जेवणासाठी विचार करा. 

दिवस नववा (रंग मोरपिशी) – नवव्या दिवशी नाश्त्यासाठी मेथी- पालकाचा पराठा करता येईल. जेवणात अळू- पालकाची मिक्स भाजी, सॅलेड, घेवड्याची भाजी, पोळी, भात तर रात्रीचे जेवणासाठी अळूची भाजी, पालकाची पुरी, भात असे करता येईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.