नवी दिल्ली – माजी खासदार व भाजपचे नेते किरीट सोमय्या मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप करतायत. मात्र आता सोमय्या यांनी पोलिस अधिकाऱ्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली असून त्यांनी मुंबईचे सह-पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर आरोप केले आहेत.
सोमय्या म्हणाले की, विश्वास नांगरे पाटील महाविकास आघाडीचे माफिया म्हणून काम करतायत. त्यांनी मला बेकायदेशीररित्या घरात कोंडून ठेवलं. तेच पोलिसांना सूचना देत होते, असा आरोपही सोमय्या यांनी केला. ते दिल्लीत बोलत होते.
नांगरे पाटील यांच्याविरुद्ध पुरावे आहेत. मला घरात कोंडलं, त्यावेळी ते सूचना देत होते. त्यावेळी आमदार मिहीर कोटेचा, प्रविण दरेकर बोलत होते. मला कोंडण्याची ऑर्डर नसताना हे झालं. मग त्यांनी का मुलुंड पोलिसांवर कारवाई केली नाही. नांगरे पाटलांना गृहमंत्री ऑर्डर देत असतील तर त्यांनी सांगावं, असंही सोयम्या यांनी नमूद केलं.