श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्त शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती ज्ञानेश्वरीच्या 9 व्या व 12 व्या अध्यायाचे पारायण करून उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी माऊलींच्या प्रतिमेचे व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी संस्थेचे सचिव अजित वडगावकर व विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे यांनी विशाल ज्ञानसागर आसलेल्या ज्ञानेश्वरीचे तसेच ज्ञानेश्वरी जयंतीचे महत्त्व व ज्ञानेश्वरी पारायणाचे फळ हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. विक्रम महाराज माळवे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, विद्यालयाचे उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अशोक बनकर, प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, ह.भ.प. विजय महाराज हुले, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सांस्कृतिक समिती प्रमुख संजय उदमले यांनी मोलाचे सहकार्य केले.