आळंदी – महाराष्ट्र शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण धोरणांतर्गत इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप केली जातात. या अनुषंगाने श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तसेच श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिर मधील 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये प्रशालेचे माजी विद्यार्थी उपनगराध्यक्ष पदावर गेल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व मोफत शालेय पुस्तकाचे महत्व स्पष्ट केले. तसेच प्रशांत कुऱ्हाडे व सुभाष महाराज मस्के यांनी गुरू विषयीचा आदर व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह. भ. प. सुभाष महाराज मस्के तसेच ज्यांच्या शुभहस्ते शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले असे विद्यालयाचे माजी विद्यार्थी आदित्य घुंडरे (उपनगराध्यक्ष आ.न.पा.), प्रशांत कुऱ्हाडे (माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक), संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अशोक बनकर, प्रायमरी विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, सांस्कृतिक समिती प्रमुख संजय उदमले, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदीप काळे यांनी व्यक्त केले.