नवी दिल्ली – भारताच्या युवराज सिंगने 2007च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात एकाच षटकात सहा सिक्स मारण्याचा विक्रम केला होता. 14 वर्षांपूर्वी 19 सप्टेंबर 2007 रोजी युवराजने टी -20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध केलेला करिष्मा क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहला गेला आहे.
दक्षिण अफ्रीकेत खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत युवराजने इतिहास करत एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारले होते. अंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सहा षटकार मारणारा एकमेव फलंदाज ठरला आहे.
किंग्समीड मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने इग्लैंडला 18 धावांनी हरवले होते. भारतीय टीमने बनवलेल्या 218 धावांचा सामना करत असताना इंग्लंड टीम 6 विकेटवर 200 धावा करु शकली होती.
इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात रॉबिन उथप्पा बाद झाल्यानंतर युवराज सिंग पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला.त्यावेळी भारताने 16.4 षटकांत 3 बाद 155 धावा केल्या होत्या.गौतम गंभीर 58, वीरेंद्र सेहवाग 68 आणि उथप्पा 6 धावा करून बाद झाले.जेव्हा युवराज फलंदाजीला आला, तेव्हा कर्णधार एमएस धोनी क्रीजवर उपस्थित होता.
स्टुअर्ट ब्रॉड19 वी ओव्हर टाकण्यासाठी आला. त्याचा पहिला चेंडू, युवराजने डीप मिड विकेट आणि लाँग ऑनवर षटकार ठोकला. दुसऱ्या चेंडूत लेग साईडच्या वर चेंडू सीमेच्या बाहेर पाठवला. ब्रॉडचा तिसरा चेंडू जो लेगस्टंपवर होता त्यावर एक्ट्रा कव्हरचा वापर करून तिसरा षटकार मारला. सलग तीन षटकार मारल्यानंतर ब्रॉडने राउंड द विकेट गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा चौधा चेंडू फुल टॉस होता त्याचा युवीने चांगला फायदा घेतला. पाचव्या चेंडूवर युवीने गुडघे जमिनीवर टेकवत मिड-विकेटवर एक लांब स्ट्रोक घेत बॉल स्टँडमध्ये पाडला. यानंतर, मिड ऑनवर सहावा आणि शेवटचा चेंडू खेळत, षटकार ठोकला. अशा प्रकारे युवराजने ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार ठोकण्याचा करिष्मा केला.