पुणे – चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील वारजे परिसरात शुक्रवारी सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी वारजे पोलिसांनी तेथे राहणार्या एका २८ वर्षाच्या नराधमाला अटक केली होती. मात्र तो शनिवारी पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला आहे.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. आरोपी हा फिर्यादीच्या घरासमोर राहतो. त्याने ४ वर्षाच्या मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आवाजामुळे हा प्रकार इतरांच्या लक्षात आला. वारजे पोलिसांनी तत्काळ या आरोपीला शुक्रवारी अटक केली होती. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. तो आज पोलिसांच्या तावडीतून पळून गेला असून वारजे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.