हडपसर – गणेशोत्सवात हडपसर मधील नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी असलेला येथील श्री गणेश फेस्टिव्हल यंदा प्रथमच साध्यापद्धतीने साजरा केला जातो आहे. त्यातही सामाजिक बांधिलकी जपत कोरोना योद्धे व रुग्णालयातील काही रुग्णांना मदतीचा हात या फेस्टिव्हल ने दिला आहे.
श्री गणेश फेस्टिव्हलचे यंदाचे हे १६ वर्ष आहे. दरवर्षी गणेशोत्सवात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र ,यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेस्टिव्हल साध्यापद्धतीने साजरा केला जातो आहे. मूर्तीची प्रतिष्ठापना मांडवात केली आहे. नियमित आरती होत आहे.
याशिवाय कोरोना योद्धांचा सन्मान केला आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या काही गरजूंना फेस्टिव्हलच्या माध्यमातून मदत करण्यात आल्याचे श्री गणेश फेस्टिव्हलचे संस्थापक कार्याध्यक्ष विजय देशमुख तसेच अध्यक्ष विकास जगताप यांनी सांगितले.