मुंबई – केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीक करताना आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले बघायला मिळत आहे. यावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर टीका केली आहे.
“राणेंचं घर ही सिंहाची गुहा नाही कोल्ह्याची आहे. लाचार लोकांच्या घराला सिंहाची गुहा म्हणणं हा सिंहाचा अपमान,” अशा शब्दांत राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान नाराणय राणे यांनी आपल्या केंद्रिय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रसुद्धा लिहले आहे.
“युवा सेनेच्या सदस्यांना आमच्या जुहूमधील घराबाहेर गोळा होण्यास सांगण्यात आल्याचं ऐकलं. मुंबई पोलिसांनी त्यांना इथे येण्यापासून थांबवावे किंवा त्यांनी थांबवलं नाही तर जे काही होईल ती आमची जबाबदारी नसेल. सिंहाच्या गुहेत प्रवेश करण्याची हिंमत करु नका. आम्ही वाट पाहत आहोत,” अशी टीका नितेश यांनी केली होती.