पुणे – टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला ॲथेलेटिक्स- भाला फेक खेळात पाहिले सुवर्ण पदक मिळवून देण्याचा मान पुण्यातील दक्षिण कमांड सुभेदार नीरज चोप्राने मिळवून देत इतिहास रचला.
नीरज चोप्रा काही वर्षापासून पुण्यात प्रशिक्षण घेत होता. आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट मध्ये कठोर परिश्रम करत मोठे यश संपादन केले. त्याच्या यशाचे गैरव म्हणून आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या मैदानाला त्याचे नाव देण्यात येणार आहे, यासाठी संरक्षण मंत्री राजनाथसिंह उपस्थित राहणार आहेत. येत्या सोमवारी (23ऑगस्ट) रोजी राजनाथसिंह पुणे दौऱ्यावर आहेत.
दक्षिणी कमांडचे सुभेदार नीरज चोप्रा यांनी ८७.५८ मीटर लांब भाला फेकून ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक अँड फील्ड गोल्ड जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनून इतिहास रचला. तो मूळचा हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील शेतकरी कुटुंबातील आहे.
पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूटमध्ये ऑलम्पिक खेळासाठी लागणाऱ्या मोठ्या सुविधा आहेत. यात लष्करातील खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात या संस्थेतून खेळाडू प्रशिक्षण घेत असतात. येथील प्रशिक्षणाच्या जोरावरच अनेक खेळाडूंनी जागतिक स्पर्धेत भारतीय लष्करातील देशाची मान उंचावली आहे.