आग्रा – ताजमहालचे सौंदर्य चांदण्या रात्री अधिक खुलून दिसते. पण गेले वर्षभर ताजमहाल रात्रीच्या पहाणीसाठी बंद ठेवण्यात आला होता. पण आता मात्र तो रात्रीही खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना ही संधी मिळणार आहे.
पहिल्या लॉकडाऊनच्यावेळी 17 मार्च 2020 पासून ताजमहालचे रात्रीचे दर्शंन बंद करण्यात आले होते. आता 21 ऑगस्ट पासून तो रात्रीच्या दर्शनासाठी खुला केला जात आहे. त्यासाठी पर्यटकांना 50-50 च्या स्लॉट मध्ये त्यासाठी सोडले जाणार आहे. हे स्लॉट्स प्रत्येकी अर्ध्या तासांचे असतील. तथापि आग्रा येथे रात्री दहा नंतर अजूनही कर्फ्यु लागू आहे.
त्यामुळे केवळ रात्री दहा पर्यंतच ताजमहाल खुला राहणार आहे. रविवारीही तेथे अजून लॉकडाऊनचे निर्बंध कायम आहेत. त्यामुळे जो पर्यंत हे सारे निर्बंध उठवले जाणार नाहीत तो पर्यंत रात्रीच्यावेळी ताजमहाल पाहण्यासाठी फार पर्यटक येणार नाहीत असे तेथील गाईड संघटनेच्या लोकांचे म्हणणे आहे.